Today’s Horoscope 21 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 21 December 2022 
वार – बुधवार.
21.12.2022.
शुभाशुभ विचार- प्रतिकूल दिवस.
आज विशेष- प्रदोष, शिवरात्री.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30
दिशा शूल – उत्तरेस असेल. आजचे नक्षत्र – विशाखा 8.33 पर्यंत नंतर अनुराधा.
चंद्र राशी – वृश्चिक.
—————————————-
मेष (शुभ रंग – मोतिया)
कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध घटनांनी तुम्हाला नैराश्य येईल. वरिष्ठांशी नमते घ्या व सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. आज जोडीदाराकडूनही फार अपेक्षा ठेवू नका.

वृषभ (शुभ रंग – सोनेरी)
आज आपल्या मर्यादेत रहा अति आक्रमकतेने नुकसान होऊ शकते. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे. पालक हिताचेच सल्ले देतील.

मिथुन (शुभ रंग – राखाडी)
आज कार्यक्षेत्रात काही आव्हानात्मक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. वैवाहिक जीवनात काही सौम्य मतभेद राहतीलच. आज भागीदारीतील व्यवहार लिखित स्वरूपात करावे.

कर्क (शुभ रंग – क्रीम)
महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून आज तुम्ही आनंदी व्हाल. रुग्णांना असाध्य आजारावर योग्य डॉक्टर सापडतील.

सिंह (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. मुलांचे अति लाड थांबवा.

कन्या (शुभ रंग – पांढरा)
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अथक परिश्रमांचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. कुटुंबीयांस अभिमानास्पद वाटेल अशी एखादी कामगिरी तुमच्या हातून घडेल.

तूळ (शुभ रंग – भगवा)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह जाणवेल. आज लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज भासेल.

वृश्चिक (शुभ रंग – चंदेरी)
आज तुम्ही थोडे हट्टीपणाने वागाल. सडेतोड बोलल्यामुळे आपलीच काही माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी करून चालणार नाही.

धनु (शुभ रंग – पिस्ता)
आज विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. घरात पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज संध्याकाळी सापडू शकेल.

मकर (शुभ रंग – मोरपंखी)
आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या उत्तरार्धात उरकणे गरजेचे.

कुंभ (शुभ रंग – नीळा)
उच्चशिक्षित असाल तर आज तुम्हाला मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब करू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पाळतील छान दिवस.

मीन (शुभ रंग – मरून) – Today’s Horoscope 21 December 2022 
ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज ध्येयाकडे तुमची वेगाने वाटचाल सुरू राहील. आज कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

Pimpri news : पवनामाई महोत्सव व जलमैत्री अभियानाला सुरुवात, विविध कार्यक्रमांच आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.