Mahavitaran Strike : वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे; कोणतेही खासगीकरण होणार नाही!

एमपीसी न्यूज : आज मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी (Mahavitaran Strike) पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महावितरणच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांची बैठक सकारत्मक रित्या पार पडली आहे. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला असून वीज कर्मचाऱ्यांना मनासारखे आश्वासन मिळाले आहे तर राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला वीज कंपन्यांचे कोणतेही खासगीकरण करायचे नाही. या उलट येत्या  तीन वर्षात राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे महावितरण आणि कर्मचाऱ्यांना मिळालेली अदानी समूह आणि खाजगीकरणाची बातमी हि चुकीची असून सरकार कोणत्याही प्रकारचे खासगीकरणं करणार नसल्याचे समोर आले आहे. उलट त्यात अधिक गुंतवणूक करणार असल्याचेही सरकारकडून स्पष्टीकरण आल्याने कर्मचारी आणि अधिकारी समाधानी झाले असून काही वेळातच पुकारलेला संप मागे घेऊन सर्व कामकाज सुरळीत चालू होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.