Chinchwad : प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मंगळागौर खेळाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – संस्कृतीचा वसा अविरत चालू ठेवण्यासाठी चिंचवड येथील कमला एज्युकेशन संचलित प्रतिभा ज्युनिअर (Chinchwad) कॉलेजमध्ये विद्यार्थिनी, महिला पालक व महिला शिक्षिकांसाठी मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन केले होते.

Moshi : महिला निर्धाराने, खंबीरपणे संकटांना तोंड देतात – रुपाली चाकणकर

आजच्या युवतींना हिंदू धर्मातील चालीरीती, प्रथा, परंपरा यांची ओळख तसेच मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांची माहिती व्हावी हा कार्यक्रमाचा उद्देश होता. मंगळागौरीची रीतसर पूजा ,आरती करून सगळ्यांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला. यामध्ये उखाणे,झिम्मा, फुगडी,दंड फुगडी, बसफुगडी, अगोटा -पागोटा,होडी ,लाट्या बाई लाट्या, गाठोडं ….अशा अनेक खेळांचा समावेश होता.

तसेच महिलांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाच्या उत्साहात भर घातली. यामध्ये उत्कृष्ट उखाणा,उत्कृष्ट महाराष्ट्रीय वेशभूषा ,उत्कृष्ट नृत्य सादरीकरण यासाठी पारितोषिके देण्यात आली. यामध्ये महिला शिक्षकवृंद, महिला पालक आणि विद्यार्थिनीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध खेळांचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी महिला पालकांनी कार्यक्रमात महिला पालकांनाही सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाचे कौतुक केले.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमास सांकृतिक विभाग प्रमुख प्रतिभा कला केंद्राच्या प्रमुख प्रा.स्नेहा भाटीया आणि प्राध्यापिका सहकारी यांनी पूर्णत्वास नेले. संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा व सचिव डॉ.दीपक शहा यांनीही या कार्यक्रमास प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुरेखा कुंभार ,समिता शिंदे, स्नेहल साळवी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा स्नेहा भाटिया यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.