Margshirsh : ओळख मराठी महिन्यांची – भाग 9 – महालक्ष्मी व्रताचा महिना मार्गशीर्ष!

एमपीसी न्यूज (रंजना बांदेकर) – मार्गशीर्ष या शब्दातच (Margshirsh) दोन शब्द दडलेले आहेत मार्ग आणि शीर्ष. मार्ग म्हणजे भगवंताच्या भक्ती मार्गावर चालून जीवनाला वेगळा आकार देऊन वासना दूर करणे आणि शीर्ष म्हणजे मन आणि आत्मा पवित्र करणे. मार्गशीर्ष हा महिना असाच पवित्र असा महिना आहे.

भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे, महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे.’ भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ‘गीता’ ही याच महिन्यात सांगितली होती म्हणून याच महिन्यात’ गीता पंचमी’ देखील साजरी केली जाते. महिन्यात भजन ,कीर्तन करण्याला अतिशय महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याला ‘अगहन ‘मास असे देखील म्हटलेले आहे.

Mulshi : ताम्हिणी घाटात 1200 फूट खोल दरीतील पाण्याच्या कुंडात तरुण बुडाला

हा महिना अनेक व्रतवैकल्याने नटलेला असतो, जसे गुरुवारचे महालक्ष्मी व्रत, सतरा दिवस चालणारे महादेवी अन्नपूर्णा व्रत, राम-सीता विवाह पंचमी.मार्गशीर्षातील पौर्णिमेला ‘दत्त जयंती’ साजरी केली जाते. या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी ‘मृगशिरा’ नक्षत्र असते म्हणून देखील या महिन्याला मार्गशीर्ष हे नाव मिळाले आहे .

मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या गुरुवारी देवी महालक्ष्मीची पूजा मोठ्या भक्ती भावाने केले जाते त्यामुळेच म्हटले आहे,

*मार्गशीर्षात गुरुवारची पूजा l
हळदी कुंकाची मज्जाच मज्जा ll*

या महिन्यात चंद्राचे चांदणे सर्वात जास्त टिपूर पसरलेले असते. हवेत सुखद गारवा आलेला असतो. सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते कारण इंग्रजी कॅलेंडरचे जुने वर्ष संपून नवे वर्ष देखील सुरू होणार असते. अशा या भावभक्तीने भरलेल्या मार्गशीर्ष महिन्यासाठी (Margshirsh) सर्वांना शुभेच्छा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.