Pune : परिक्रमा आयुष्यातील मोठी तपस्या आहे. – संजय कठाळे

एमपीसी न्यूज – नर्मदा ही जीवनदायीनी आहे. अनेक ( Pune)  लोकांचे जीवन सुफलित केले आहे. नर्मदा परिक्रमा ही फक्त परिक्रमाच नसून ती आयुष्यातील खूप मोठी साधना व तपस्या आहे. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी, असे प्रतिपादन नागपूर येथील जेष्ठ नर्मदा परिक्रमावासी संजय वासुदेव कठाळे यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभाग व संस्कृती संवर्धन विकास महासंघाच्या वतीने  आयोजित केलेल्या ‘नर्मदा परिक्रमा कथा अनुभव’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी जबलपूर येथील परिक्रमावासी संदीप प्रकाश परांजपे यांनी नर्मदा मैया तीर्थ व प्रसाद सर्वांना उपलब्ध करून दिला.

या प्रसंगी भास्कर रिकामे, विकास देशपांडे, विश्वास करंदीकर, चंद्रशेखर जोशी, सतीश सगदेव, माधुरी ओक,वैदेही पटवर्धन, हर्षदा कापटकर ,उज्वला जाधव , वीणा महाजन, राधिका सुखटणकर, उन्नती वैद्य  तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे महिला विभाग व महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील सुमारे 150 नागरिक उपस्थित होते.

Margshirsh : ओळख मराठी महिन्यांची – भाग 9 – महालक्ष्मी व्रताचा महिना मार्गशीर्ष!

यावेळी बोलताना संजय कठाळे म्हाणाले की, वयाच्या 60 व्या वर्षी बायपास सर्जरी झाली असताना व उच्च रक्तदाब व अनेक व्याधीने शरीरावर परिणाम केले असताना कुलस्वामिनीच्या शोधात नर्मदा परिक्रमाची संकल्प केली आणि मैयेच्या सहवासात मी खडखडीत बरा झालो आणि नर्मदा परिक्रमा सिद्धीस नेली ही मैयाचीच कृपा, अशी भावना कठाळे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात नर्मदा मातेच्या प्रतिमेचं पूजनाने सुरुवात झाली, संजय कठाळे व ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी अनंतपुरे व डॉ. अजित जगताप यांनी केले. परिचय ज्योती कानिटकर यांनी करून दिले. शिवानंद चौगुले यांनी आभार ( Pune) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.