Paush : ओळख मराठी महिन्यांची – भाग 10 – गोडवा देणारा पौष महिना

एमपीसी न्यूज : हेमंत ऋतूतील कडाक्याची थंडी घेऊन (Paush) येणारा हा महिना. अलीकडे हवामान बदलामुळे मुंबईत एवढी थंडी पडत नाही पण मुंबई बाहेर मात्र चांगलीच थंडी जाणवत असते. मुंबईकर ही अधून मधून गुलाबी थंडीचा आस्वाद घेत असतात. पौष महिन्याला हे नाव सूर्याच्या ‘पुष्य” नक्षत्राच्या प्रवेशामुळे मिळाले आहे. सूर्याचा प्रभाव वर्षातून दोन वेळा पृथ्वीवर जास्त जाणवत असतो. एक म्हणजे मार्च एप्रिल व दुसरा डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात सूर्य आपला जास्तीत जास्त प्रकाश पृथ्वीपर्यंत देत असतो. त्यामुळे या महिन्यात सूर्य उपासनेला जास्त महत्त्व आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘सूर्य आदित्याय नमः ‘हा मंत्र पौष महिना महिन्यात रोज म्हणावा. पौष महिन्यात येणारे मुख्य सण म्हणजे भोगी, मकर संक्रांत, रथसप्तमी, शाकांबरी देवीचे नवरात्र,नवान्न पौर्णिमा.

‘पौष महिन्यात मकर संक्रांत, सारे आनंदी तिळगुळ देण्यात”

मकर संक्रांत हा भारतातील मुख्य सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होत जातो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगीला घराघरातून बाजरीची भाकरी, लोणी व मिक्स भाजी असा नैवेद्य असतो. पौष महिन्यात तीळ, ड्रायफ्रूट, शेंगदाणे यासारख्या स्निग्ध पदार्थांचा वापर आरोग्यदायी ठरतो, म्हणूनच संक्रांतीला गुळाची पोळी व तिळगुळ यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला “असे म्हणत तिळगुळ वाटला जातो.

त्याचप्रमाणे स्त्रिया हळदीकुंकू सुद्धा करतात. मकर संक्रांतीला पतंग (Paush) देखील उडवण्यात येतात. मराठी मधली अनेक गाणी अगदी बालगीत ,’पतंग उडवू चला l गड्यांनो, पतंग उडवून चला पासून ते ”चढा ओढीने उडवत होते, बाई मी पतंग उडवीत होते ” यासारखी लावणी देखील आठवते. यानंतर येते रथसप्तमी. या दिवशी सूर्याचे तेज सर्वात जास्त असते. काही ठिकाणी घराच्या अंगणात चूल पेटवून दूध ओतू घालवून सूर्याला नैवेद्य केला जातो. यानंतर येते शाकांबरी देवीचे नवरात्र. नऊ दिवस देवीची उपासना व आराधना केली जाते.

Milind Deora : 55 वर्षांचे नाते तोडून मिलिंद देवरा जाणार शिंदे सेनेत; महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप

योग अभ्यासासाठीही हा महिना महत्त्वाचा मानला जातो. सूर्य उपासना करताना रोज सूर्यनमस्कार घालावेत असे शास्त्रात सांगितले आहे. या महिन्यात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचीही जयंती असते. अशा या विविधतेने नटलेल्या पौष महिन्यात सारे आनंदी राहून नवीन वर्षाचे स्वागत करू.

– रंजना बांदेकर 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.