Chinchwad : रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरात रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज – राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन (Chinchwad) कार्यालयाच्या वतीने शहरातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. सोमवारी (दि. 15) भक्ती शक्ती चौक ते मोशी येथील ट्राफिक पार्क या मार्गावर ही रॅली काढली जाणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.

राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाणार आहे. या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शालेय शिक्षण विभाग व इतर सर्व संबंधित संस्था संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार जनजागृती आणि प्रबोधनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

Paush : ओळख मराठी महिन्यांची – भाग 10 – गोडवा देणारा पौष महिना

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात देखील राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त (Chinchwad) सोमवारी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांची जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.

सोमवारी सकाळी नऊ वाजता भक्ती शक्ती चौक येथून या रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली पुढे आकुर्डी चौक, एस के एफ मार्गे रामकृष्ण नाट्यगृह, चिंचवड स्टेशन, केएसबी चौक, स्पाईन रोड मार्गे मोशी येथील ट्राफिक पार्क येथे जाईल. ट्राफिक पार्क येथे या रॅलीचा समारोप होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.