Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जाणारे एका तरुणाला (Chakan) भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 10 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर आळंदी फाटा, चाकण येथे घडला.

सुरज राम केबल प्रजापती (वय 24, रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील रामकेवल प्रजापती यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहना वरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरात रॅलीचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुरज हा पुणे नाशिक (Chakan) महामार्गावर आळंदी फाटा येथे रस्त्याने पायी चालत जात होता. गंधर्व हॉटेल जवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या वाहनाने सुरज यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुरज यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.