Maval : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार (Maval)असलेल्या श्रीरंग बारणे यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केल्यानंतर आता महायुतीतील मित्रपक्ष भाजप पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटानेही मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील (Maval)पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत या विधानसभा मतदारसंघाचा समावेश येतो. मावळमधून श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यावेळी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत.

Khed : जागेत मुरूम टाकण्यावरून दोघांना जिवे मारण्याची धमकी

आता शिवसेना फुटली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खासदार बारणे आहेत. शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीत आहे. खासदार बारणे यांनी मावळमधून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या मिटींगमध्ये आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. महायुतीत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे.

मावळातून, जर पक्षाने लढ म्हणून सांगितले, तर माझ्यापेक्षा माझे कार्यकर्ते जास्त उत्साहाने तयार आहेत, असे सांगत माजी राजमंत्री बाळा भेगडे यांनी सोमवारी आपणही इच्छुक असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते. त्यानंतर आज मंगळवारी महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी मावळवर दावा केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मावळ विधानसभेत पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. रायगड जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात पक्षाची चांगली ताकद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून मावळ लोकसभा मतदार संघातील सर्व परिस्थितीचा लेखी आराखडा देणार असल्याचेही आमदार शेळके यांनी सांगितले. त्यामुळे मावळ मधील जागेचा तिढा वाढेल असे दिसते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.