Maval Corona News : मावळची रुग्णसंख्या घटली! नवीन 49 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि.30 )49 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 155 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 933 आहे.

शहरी भागात 44 रूग्ण तर ग्रामीण भागात 05 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 38 रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 02 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 04 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 31,279 झाली आहे. तर दिवसभरात 155 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

रविवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कान्हे येथे 02 रूग्ण सापडले. आर्डव, धानगव्हान व काले येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला. असे एकूण 05 रुग्ण सापडले. 29, 821जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 10,645 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,046व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,534 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 17,225 रुग्ण तर ग्रामीण भागात 14,054 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 95.34 टक्के आहे तर मृत्यू दर 1.68 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 629 लोणावळा नगरपरिषदमध्ये 73 वडगाव नगरपंचायतमध्ये 27 ग्रामीण भागात 204 असे एकूण 933 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.