Pune News : मॉल आणि सुपर मार्केटमध्ये दारू विक्रीच्या निर्णयाविरोधात स्वाक्षरी मोहीम

एमपीसी न्यूज – मॉल आणि सुपर मार्केटमध्ये दारू विक्रीची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र आणि शहर भाजपा एनजीओ आघाडी यांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेत आपला निषेध नोंदविला.

यावेळी माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, संजय हिरवे, जयपाल दगडे, संतोष पटवर्धन, जयंत अहिरे, प्रमोद शेळके, विवेक राजगुरू, विजय शिंदे, जयश्री वायदंडे, सुयोग लाड, प्रदीप खरसे, भूषण जगदाळे, गणेश शारंगधर,अपर्णा कुऱ्हाडे, सुजित गोटेकर उपस्थित होते.

डॉ. अजय दुधाणे म्हणाले, मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय दुर्दैवी आहे. शासनाचा हा निर्णय तरुणांना व्यसनाकडे आकर्षित करू शकतो. एकीकडे अनेक संस्था व्यसनमुक्ती साठी प्रयत्न करत असताना राज्य शासनाचा हा निर्णय व्यसनाधीनता वाढविणारा आहे. याचा निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.