Maval Corona Update : मावळात आज 108 नवे रुग्ण; 46 जणांना डिस्चार्ज, सक्रिय रुग्णांची संख्या 1189

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.20) 108  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 46  जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आज दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत 254 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 1189 आहे.

लोणावळा नगरपरिषद हद्दीत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली असुन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेपेक्षा अधिक रुग्ण लोणावळा हद्दीत आहेत.

शहरी भागात 68 तर ग्रामीण भागात 40 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 10 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 47 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 11 रुग्ण सापडले. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11,756  झाली आहे. तर दिवसभरात 46  जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

मंगळवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात कामशेत 17, तळेगाव दाभाडे ग्रामीण 7, कुसगाव बुद्रुक 7, काले 3, वळवंती 2, टाकवे बुद्रुक 2, भोयरे व कान्हे येथे प्रत्येकी 1 असे एकूण 40 रुग्ण सापडले.

10,313 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 3740,लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2306 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 738 रुग्ण सापडले आहेत.शहरी भागात 6784  रुग्ण तर ग्रामीण भागात 4972 रुग्ण आढळून आले आहेत. 5 रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.73 टक्के आहे तर मृत्यू दर 2.16  टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 234 , लोणावळा नगरपरिषद मध्ये 306, वडगाव नगरपंचायतमध्ये 70  व ग्रामीण भागात 579 असे एकूण 1189  रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.