Maval Corona Update : मावळ तालुक्यात आज कोरोनाचे 39 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (गुरूवारी, दि. 8) कोरोनाचे 39 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 5 हजार 156 झाली आहे. तर दिवसभरात 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

लोणावळा (पुरुष, 43 वर्ष), कल्हाट (पुरुष, 75 वर्ष) येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 29 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 10 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तळेगाव शहरात 6, लोणावळा शहरात 21, वडगाव शहरात 2 रुग्ण आढळले आहेत.

एकूण 5 हजार 156 रुग्णांमध्ये सध्या 521 रुग्ण सक्रीय आहेत. तर 4 हजार 458 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 177 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 1 हजार 543, लोणावळा नगरपरिषद 1 हजार 183 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 311 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 2 हजार 119 रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण

गुरूवारी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये सोमाटणे 2, देवले 2, वराळे, उर्से, इंदोरी, शिरगाव, नाणे, कल्हाट येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मावळातील 36 गावांमध्ये 15 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. तर 5 गावांमध्ये 15 पेक्षा अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 41 गावांना कोरोना शिल्लक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.