Maval Corona Update : मावळात कोरोनाचे आज 16 रुग्ण; 34 जणांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज  – मावळ तालुक्यात रुग्णांची संख्या कमी होत आहे. तालुक्यात शुक्रवारी (दि . 23) 16 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागात केवळ 4 रुग्ण सापडले.  शुक्रवारी एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नाही.

मावळ तालुक्यात आतापर्यंत 196 मृत्यू झाले आहेत. तालुक्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 7340 झाली आहे. तर दिवसभरात 34  जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 12 रुग्ण शहरी भागात तर 4 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये तळेगाव दाभाडे ग्रामीण 1, कामशेत 1, वराळे 1, गोवित्री 1  असे  एकूण 4  रुग्ण आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 6 , लोणावळा नगरपरिषद हद्दीत 2 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 4 असे एकूण 12  रुग्ण सापडले आहेत.  339 रुग्ण सक्रिय आहेत. 6805  जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मावळ तालुक्यात  तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक2129 , लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1457 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 504 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 4090 रुग्ण तर ग्रामीण भागात 3250 रुग्ण आढळून आले आहेत. 2  रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहरे व कोविड समन्वयक डॉ. गणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.