Maval Corona Update : मावळ तालुक्यात मंगळवारी 58 नवीन रुग्ण; 80 जणांना डिस्चार्ज

कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 473 झाली आहे. : 58 new patients in Maval taluka on Tuesday; Discharge of 80 persons

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 18) कोरोनाचे 58 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 1 हजार 473 झाली आहे. तर दिवसभरात 80 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज दिवसभरात दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण चांदखेड (पुरुष, 70 वर्ष), साते (पुरुष, 56 वर्ष) येथील आहेत.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 28 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 30 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये वराळे 13, कामशेत 5, साते 2, माळवाडी, परंदवडी, कुसगाव बु., धामणे, सोमाटणे, कान्हे, बेबडओहळ, शिवणे, ओझर्डे, कार्ला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 23, लोणावळा शहरात 2 आणि वडगावमध्ये 3 रुग्णाची नोंद झाली आहे.

एकूण 1 हजार 473 रुग्णांमध्ये सध्या 357 रुग्ण सक्रीय आहेत. तर 1 हजार 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 486, लोणावळा नगरपरिषद 153 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 109 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 725 रुग्ण आढळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.