Maval : आमदार चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली संत तुकारामनगरमध्ये प्रचार

एमपीसी न्यूज- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक महत्वाचा परिसर व सुमारे 45 हजार मतदार असलेल्या संत तुकाराम नगर भागात सलग दुस-या दिवशी आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करण्यात आला.

आमदार चाबुकस्वार यांच्या समवेत भाजप नगरसेविका सुजाता पालांडे, सेनेचे विभाग प्रमुख राजेश वाबळे, युवा सेनेचे शहराध्यक्ष अभिजीत गोफण, विभाग प्रमुख अनिल पारचा, संजय गांधी योजना समितीचे पिंपरीचे अध्यक्ष नितीन घोलप आदी प्रमुख या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक नागरिकांना समक्ष भेटून श्रीरंग बारणे यांच्या कार्यअहवालाची माहिती व पत्रकाचे वाटप केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.