Maval News : अर्थसंकल्पात सुदुंबरे तीर्थक्षेत्राला 25 कोटी रुपये मंजूर

एमपीसी न्यूज – शिंदे-फडणवीस सरकारने मावळ तालुक्‍यातील एका विशेष कार्यासाठी तब्बल 25 कोटी रुपयाची घोषणा केली.अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना राज्यातील अनेक भागातील महापुरुष आणि संत महात्मे यांच्या समाधी, स्मारक विकासासाठी निधींची तरतुद जाहीर केली. यावेळी मावळ तालुक्यातील (Maval News) श्री क्षेत्र सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाच्या मंदिराच्या विकासासाठी देखील सरकारकडून खास 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.

 

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प गुरुवार (दि 9 मार्च) रोजी जाहीर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आणि शिंदे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे वाचन केले. यावेळी फडणवीसांनी अर्थसंकल्पातून राज्याच्या विविध क्षेत्रासाठी अनेक तरतुदी आणि अनेक नव्या योजनांच्या घोषणा केल्या. मावळ तालुक्यासाठी या अर्थसंकल्पातून काय मिळणार, याकडे सर्वच तालुकावासियांचे लक्ष लागले होते.

अखेर शिंदे-फडणवीस सरकारने मावळ तालुक्‍यातील एका विशेष कार्यासाठी तब्बल 25 कोटी रुपयाची घोषणा केली.अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना राज्यातीस अनेक भागातील महापुरुष आणि संत महात्मे यांच्या समाधी, स्मारक विकासासाठी निधींची तरतुद जाहीर केली. यावेळी मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाच्या मंदिराच्या विकासासाठी देखील सरकारकडून खास 25 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.

माजी मंत्री बाळा भेगडे यांनी सुदुंबरे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला भरीव अशी मागणी केली होती. आज महायुती सरकारने 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सरकारचे तालुक्याच्या जनतेने जाहीर आभार मानले.

संत जगनाडे महाराज मंदिर – सुदुंबरे

संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे समाधी मंदिर मावळ तालुक्यातील सुदुंबरे या (Maval News) गावी आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला होता.  18 डिसेंबर 1689 रोजी सुदुंबरे मध्येच त्यांचा मृत्यू झाला. जगनाडे महाराज यांचे सुदुंबरे येथे समाधी मंदिर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.