Vadgaon Maval : पिंपळखुटे येथे महिलांचा ‘तू ही कर्तबगार’ उपाधीने सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त (Vadgaon Maval) बेबड ओहोळ-पिंपळखुटे ग्रामपंचायत हद्दीतील राजकीय, सामाजिक, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ‘तू ही कर्तबगार’ म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.  उपसरपंच कमल रोहिदास गराडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात 30 महिलांचा सन्मान करण्यात आला.

माजी उपसरपंच कमल रोहिदास गराडे यांच्या पुढाकाराने पिंपळखुटे येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ निगडीच्या कमलजीत कौर, उपस्थित होत्या. यावेळी गावातील ३० महिलांना ‘तु-हि कर्तबगार’ सन्मान प्रदान करण्यात आला.

Maval News : अर्थसंकल्पात सुदुंबरे तीर्थक्षेत्राला 25 कोटी रुपये मंजूर

यामध्ये माजी सरपंच सुशीला जाधव, अर्चना घारे, सारिका घारे, सुषमा गायकवाड, सविता सप्रे, माजी उपसरपंच सुनीता घारे, नम्रता घारे, मनीषा घारे, कविता ढमाले, संध्या शिंदे, लताबाई गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्या शोभा गायकवाड, मालाबाई गायकवाड, सुजाता गराडे, नंदा गराडे, कल्पना गराडे, पोलीस पाटील दुर्गा घारे, कात्रज दूध डेअरीच्या मॅनेजिंग डायरेक्टर माधुरी ढमाले, मुख्याध्यापिका नीलम साळुंखे, शिक्षिका अर्चना भरगंडे, कल्पना देशमुख, सुनीता शेळके, अंगणवाडी सेविका जयश्री मारणे, आशा घारे, शामल गराडे, नयना घारे, उज्वला पायगुडे, निमा हिंगे, स्वयंसेविका सुजाता घारे, सुषमा थोरवे, वैशाली गायकवाड या महिलांचा सन्मान करण्यात आला.

माजी उपसरपंच कमल गराडे म्हणाल्या, गावाच्या जडणघडणीत महिलांचा सहभाग महत्वाचा असत. ग्रामपंचायत, शिक्षण, सहकार, आरोग्य अशा विविध विभागात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात व गावच्या विकासाला हातभार लावतात. त्यामुळे महिलादिनी अशा कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.