Maval News: सुदुंबरे येथे कोराना सर्वेक्षण मोहीम यशस्वी; आढळले नवे चार पॉझिटीव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली “माझे कुटुंब माझी जबाबदारी” आरोग्य मोहीम सुदुंबरे येथे यशस्वीरित्या राबविण्यात आली. ग्रामपंचायत, सिद्धांत काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग व विविध सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून मोहिम राबवली.

गावातील 850 कुटुंबातील सुमारे 4000 लोकांची कोरोना संदर्भात आरोग्य तपासणी व सर्व्हेक्षण करण्यात आले. चार रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर्स यांनी सिद्धांतचे सेवा योजनेचे विद्यार्थी व कार्यकर्ते (स्वयंसेवक) यांच्या मदतीने तपासणी व सर्वेक्षण पूर्ण केले.

यावेळी सरपंच सुनीता गाडे, उपसरपंच बाळा आंबोले, ग्रामपंचायत सदस्य उमा शेळके व आशा गाडे, प्रा. नंदा कुलकर्णी, हरीहर चौरे, संजय कसबे तसेच आदिनाथ कुसुमकर, भिवा साळवी, दादा जाधव उपस्थित होते.

विस्तार अधिकारी बाळासाहेब वायकर, पर्यवेक्षक सुधाकर चाबुकस्वार, अंगणवाडी विभागाच्या पर्यवेक्षिका सुधा देसले यांनी सर्व्हेक्षण व तपासणीबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.