Maval : मावळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी ( Maval) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 1) मंत्रालयात बैठक पार पडली.आई एकविरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा,जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील उड्डाणपूल,जांभूळ येथील क्रीडा संकुल,ग्लास स्कायवॉक आदी प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेत सर्व कामांना गती देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

 

Vadgaon Maval  : अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान – राजेश वाघोले

 

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,आमदार सुनिल शेळके तसेच वित्त व नियोजन विभाग, सा.बां विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पांना गती देण्याच्या सुचना बैठकीत दिल्याने मावळच्या सर्वांगीण विकासाच्या दूरदृष्टीतून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामांचा वेग वाढणार आहे. असे आमदार सुनिल शेळके ( Maval) म्हणाले.
याबैठकीत मावळातील विकासकामे, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सद्यस्थिती व पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली.

● आई एकविरा देवी मंदिर परिसर विकास आराखडा व रोप-वे उभारणे कामास गती देण्यासाठी वन विभाग व पुरातत्व विभागाच्या संपूर्ण परवानग्या (NOC) दोन महिन्याच्या आत घेण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
● जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी कार्ला ते देहूरोड दरम्यान आवश्यक असलेल्या आठ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठीच्या प्रस्तावाला MSRDC च्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
● जांभूळ येथे क्रीडा संकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर केलेला असून तालुकास्तरीय अद्ययावत क्रिडा संकुल उभारण्यासाठी तात्काळ मान्यता द्यावी.
● ग्लास स्कायवॉक प्रकल्पाचा संपूर्ण विकास आराखडा राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.