Lonavala : चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा अपघात; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ( Lonavala ) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो एका वाहनावर आदळला. यामध्ये टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

टेम्पो चालक सुनील जालिंदर कांबळे (वय 40, रा. कळंबी, ता. खानापूर, जि. सांगली), विष्णू भीमराव गाडे (वय 55, रा. राजापूर, ता. तासगाव, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत.

Maval : मावळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक

टेम्पो चालक कांबळे सांगलीहून मुंबईला द्राक्ष घेऊन जात होता. गुरुवारी पहाटे लोणावळा जवळ औंढे पुलाजवळ टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वाहनावर आदळला.

या धडकेत टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत टेम्पो चालक आणि त्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत ( Lonavala )  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.