Wakad News : कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 24) पावणेदहा वाजताच्या सुमारास भूमकर चौक ते डांगे चौक रोड, वाकड येथे डेअरी फार्म समोर केली.

कृष्णा तुळशीराम राऊत (वय 22, रा. काळाखडक, वाकड, मूळ रा. वाशी, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी अतिक शेख यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस परिसरात गस्त घालत असताना एक तरुण भूमकर चौक ते डांगे चौक रोड, वाकड येथे डेअरी फार्म समोर कोयता घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी कृष्णाकडून कोयता जप्त केला.

कृष्णाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्याच्या मोबाईलच्या स्टेटसला शेअरचॅटवरून डाऊनलोड केलेला पिस्तूलचा व्हिडिओ ठेवला असल्याचे आढळले. आरोपी कृष्णा हा पोलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दीपक साबळे, अतिष जाधव, बाबा चव्हाण, अतिक शेख, प्रमोद कदम, कौंतेय खराडे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.