​ ​मोठी बातमी: ​15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात

एमपीसी न्यूज: पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी लसीकरणासंबधी  तीन मोठ्या निर्णयाची घोषणा आज केली. त्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी व्हॅक्सिनेशन सुरू होणार आहे. तीन जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले,  15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांबरोबरच कोरोना विरोधातील लढाईत महत्वाचे योगदान देणाऱ्या हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सनाही कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्रिकॉशन म्हणून 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात होईल, याच बरोबर 60 वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी घोषणाही यावेळी पंतप्रधान मोदींनी केली.

पुढे ते म्हणाले, “मास्कचा भरपूर उपयोग करा. हात वारंवार धुणे हे विसरू नका. व्हायरस म्युटेड होत असला तरी आपला आत्मविश्वासही वाढत आहे. आता देशाजवळ 18 लाख आयसोलेशन बेड आहेत. 5 पाच लाख आयसोलेशन बेड, 1 लाख 40 हजार आयसीयू बेड आणि मुलांसाठी 90 हजार बेड उपलब्ध आहेत. चार लाख आॅक्सिजन सिलिंडर देशभरात दिले आहेत. बफर डोस तयार करायला राज्यांना सहकार्य करण्यात येत आहे. व्यक्तिगत स्तरावरील सर्व नियमांचे पालन हेच कोरोनाच्या विरोधात लढण्याचे मोठे हत्यार आहे. दुसरे हत्यार म्हणजे लस. लसनिर्मीतीसाठी अनेक आपण निर्णय घेतले. त्यामुळे लसनिर्मिती आणि त्याचे वाटप हे नियोजनबद्ध करण्यात आले. आतापर्यंत 141 कोटी व्हॅक्सिन डोन देण्याचे उद्दीष्ट भारताने पूर्ण केले आहे. ही मोठी कामगिरी असल्याचे मोदी यांनी सांगितले. गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अशा राज्यांनी सिंगल डोस हा शंभर टक्के पूर्ण केला आहे. देशात लवकरच डीएनए व्हॅक्सिनही उपलब्ध होणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.