Maval News : ‘भाजयुमो युवा वॉरियर्स’च्या जिल्हा अध्यक्षपदी संस्कार चव्हाण

एमपीसी न्यूज – मावळ येथील संस्कार तानाजीराव चव्हाण यांची पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा-युवा वॉरियर्सच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

माजी मंत्री बाळा भेगडे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, युवा वॉरियर राज्य प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष अनूप मोरे व युवा जिल्हाध्यक्ष किरण दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष किरण दगडे पाटील व जिल्हा भाजपा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यांच्या हस्ते चव्हाण यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

या प्रसंगी शिवम बालवडकर, प्रतिक गुजराथी, शिरुर तालुका भाजपा युवा अध्यक्ष रोहित खैरे, सुरज चव्हाण, हर्षल शेलार, रुतुराज काशिद आदि उपस्थित होते.

युवकांचे मजबुत संघटन करून त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहणार असल्याचे तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्यात युवा वॉरियर्स या संकल्पनेचा विस्तार करणार असून तरुणांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे संस्कार चव्हाण यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.