Khadaki Crime News : खडकीच्या दारूगोळा फॅक्टरीतून चंदनाच्या आणखी सात झाडांची चोरी

एमपीसीन्यूज : पुण्याच्या खडकी परिसरात असलेल्या दारुगोळा फॅक्टरीतून 26 जून रोजी चंदनाची आठ झाडे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तीन दिवसांनी याच परिसरातील बोट क्लब भागातून आणखी सात चंदनाच्या झाडे चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गेल्याच आठवड्यात दारूगोळा फॅक्टरी परिसरातून 8 झाडे चोरल्याचे समोर आले होते. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार शनिवारी (दि. 19) मध्यरात्री घडला आहे. याबाबत पुरुषोत्तम कुमार (वय 58, रा. रेंजहिल) यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे दारूगोळा फॅक्टरीत ज्युनिअर वर्कर मॅनेजर आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दारूगोळा फॅक्टरी च्या परिसरात असलेल्या बोट क्लब भागातून या झाडांची चोरी झाली. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

दरम्यान, दारूगोळा फॅक्टरी परिसरात 24 तास बंदोबस्त असूनही अशा प्रकारच्या लागोपाठ घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खडकी पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.