Khadaki : खडकीत फूटपाथवर झोपण्याच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाचा वार करत खून, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – दारू पिऊन आलेल्या आरोपीने फुटपाथवर (Khadaki) झोपण्याच्या कारणावरून 75 वर्षीय नागरिकाचा शस्त्राने वार करत खून केला आहे, ही घटना खडकी बाजार परिसरात काल (रविवारी) रात्री घडली.

मंगेश भागाजी भद्रिके (वय 75, रा. खडकी रेल्वे स्थानकासमोर) असे खून (Khadaki)झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी विकास रामचंद्र गायकवाड (वय 52, रा. खडकी बाजार चौपाटी) याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : सीबीआय आणि एसीबीचे तर्फे पुणे पोस्ट ऑफीस विभागाच्या कर्मच्याऱ्यांनी घेतले दक्षतेचे धडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रिके, गायकवाड खडकी बाजार परिसरात किरकोळ कामे करतात. दोघे जण खडकी रेल्वे स्थानकासमोर पदपथावर राहायला आहेत. दोघे परगावचे आहेत. पदपथावर झोपण्याच्या जागेवरुन त्यांच्यात वाद झाला होता.

आरोपी गायकवाड दारु पिऊन रात्री आला. झोपेत असलेल्या भद्रिके यांच्यावर त्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या भद्रिके यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पसार झालेल्या गायकवाडला पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.