Pimple Gurav : फ… फटाक्याचा अन् प्र…प्रदूषणाचा पथनाट्यातून फटाकेमुक्त दिवाळीसाठी प्रबोधन

एमपीसी न्यूज – ‘फ… फ… फटाक्याचा अन् प्र… प्र… प्रदूषणाचा!’ या पथनाट्याच्या (Pimple Gurav)प्रभावी सादरीकरणातून राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे गुरव येथे रविवार (दि.5) दिलासा संस्था, कलारंजन प्रतिष्ठान, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या तीन संस्थांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी नागरिकांचे प्रबोधन केले.

यावेळी वृक्षमित्र अरुण पवार, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, (Pimple Gurav)ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर, तानाजी एकोंडे, कलारंजनचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, दिलासाचे अध्यक्ष सुरेश कंक आणि मानवी हक्क संरक्षणचे अध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्यासह साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील आदी उपस्थित होते.

Pune :आमदार रवींद्र धंगेकर यांची 8 नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथे जाहीर सभा

‘फ… फ… फटाक्याचा अन् प्र… प्र… प्रदूषणाचा!’ या पथ नाट्यात संजना करंजावणे, अण्णा जोगदंड, शामराव सरकाळे, सुभाष चव्हाण, मुरलीधर दळवी, नंदकुमार कांबळे, श्रावणी अडागळे, सारंगी करंजावणे, सुरेश कंक यांनी सहभाग घेऊन फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाविषयी नाट्यपूर्ण प्रसंगांचे सादरीकरण करून उद्बोधक माहिती दिली.

यावेळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामुदायिक शपथ घेण्यात आली त्यामध्ये आत्माराम हारे, रेखा सातोकर, तुळशीराम जगदाळे, उमा मोटेगावकर, गणेश वाडेकर, विजया नागटिळक, संजय गमे, जयश्री गुमास्ते, वामन भरगंडे, बाळासाहेब साळुंके, दिनेश घोगरे, योगिता कोठेकर, नीलेश हंचाटे, सागर जाधव, सूर्यकांत तिकोणे, अंकुश जाधव यांनी सहभाग घेतला. तर सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.