Pune : सीबीआय आणि एसीबीचे तर्फे पुणे पोस्ट ऑफीस विभागाच्या कर्मच्याऱ्यांनी घेतले दक्षतेचे धडे

एमपीसी न्यूज – देशभरात 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या (Pune )कालावधीत पाळल्या जाणार्‍या दक्षता जागरुकता सप्ताहा निमीत्त शुक्रवारी (दि.3) पुणे पोस्ट ऑफीस विभागात सीबीआय आणि एसीबीचे तर्फे दक्षता व जागरूकता संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सुधीर हिरेमठ (IPS), पोलीस उपमहानिरीक्षक, CBI पुणे, आणि( Pune )अमोल तांबे (IPS), पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य ACB, पुणे हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी अनुक्रमे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. पुणे पोस्टल विभागातील 150 हून अधिक टपाल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कार्यशाळेत सक्रियपणे भाग घेतला.

Dehuogaon : विद्यार्थ्यांसोबत पालकांनी देखील लुटला अभंग दिवाळी मेळ्याचा आनंद

यानंतर प्रमुख वक्ते अमोल तांबे (IPS) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) द्वारे चालवल्या जाणार्‍या उपक्रमांवर प्रकाश टाकत पोलीस विभागातील त्यांचे मौल्यवान अनुभव सांगितले. सत्रे परस्परसंवादी होती. त्य़ामुळे कर्मच्याऱ्यांनी सतर्कतेबाबात जाणून घेतले.कार्यक्रमाची सांगता पुणे डाक विभागाचे आभार मानून करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.