Pune :आमदार रवींद्र धंगेकर यांची 8 नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथे जाहीर सभा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध काँग्रेस आय कमिटीचे (Pune)आमदार रवींद्र धंगेकर यांचा दिनांक 8 नोव्हेंबर रोजी तळेगाव दाभाडे येथे दौरा असून तळेगाव दाभाडे येथे सायंकाळी 5 वाजतायोगीराज हॉल येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील काँग्रेस आय पक्ष संघटना मजबूत (Pune)व्हावी व कार्यकर्त्यांना नवीन चेतना मिळावी यासाठी दीपावलीच्या पूर्वसंध्येला मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत यांनी कळवले आहे.

Pimpri : वाढदिवसानिमित्त अमित गोरखे यांनी राबविलेला पुस्तकांचा उपक्रम राजकारणात पथदर्शी ठरेल – डॉ. गिरीश आफळे

मावळ तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी योगीराज मंगल कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी केले आहे.

मावळ तालुक्यात काँग्रेस आय पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या बांधणीसाठी तसेच पक्षातील कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणार असल्याचे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते रामदास काकडे यांनी सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.