Khadaki Crime News : दुचाकीने कट मारल्याचा रागातून टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसीन्यूज : दुचाकीने कट मारल्याचा किरकोळ कारणावरून एका टोळक्याने तरुणावर धारदार हत्याराने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोपोडी परिसरात हा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

याप्रकरणी अभिषेक मोरे (वय 30, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार 8 ते 10 जणांच्या टोळक्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी फिर्यादी हे रात्रीच्या सुमारास खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाऊ पाटील रोडने जात होते. त्यावेळी दुचाकीने जाणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना कट मारला आणि ‘तुला गाडी नीट चालवता येत नाही का’, असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी आणि संबंधित व्यक्ती दोघेही निघून गेले.

या सर्व प्रकारानंतर फिर्यादी हे घराच्या बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी आपल्या आणखी काही साथीदारांना याठिकाणी घेऊन आला आणि पुन्हा फिर्यादी सोबत वाद घातला. यावेळी त्याने पालघनने फिर्यादीवर वार केला. मात्र तो फिर्यादी यांनी चुकवला आणि येथून पळ काढला.

त्यानंतरही आरोपीने हातात पालघन घेऊन फिर्यादीचा पाठलाग करत परिसरात दहशत पसरवली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.