Chinchwad News : अन्नदानातून भारतीय संस्कृतीचे जतन : कृष्ण प्रकाश

एमपीसीन्यूज : आपल्या जवळील अन्नातून भुकेलेल्यांना अन्न देणे ही संस्कृती. भुक असताना अन्न ग्रहण करणे ही प्रकृती, तर पोट भरलेले असताना अन्न ग्रहण करणे ही विकृती आहे. मात्र,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक संस्था थांबलेल्या असताना भुकेल्या कष्टकरी बांधवांना महिनाभरापासून अन्नदान करून कष्टकरी संघटनेने आपले कर्तव्य जपले आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

वर्किंग पिपल्स चार्टर, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने चिंचवडच्या थरमॅक्स चौकात सुरू असलेल्या मोफत अन्नदान कार्यक्रमात पोलीस आयक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते कष्टकरी बांधवाना अन्नदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कामगार नेते काशीनाथ नखाते, संघटनेचे प्रदेश संघटक अनिल बारवकर, सचिन नागणे, उपाध्यक्ष राजेश माने, कार्याध्यक्ष महेश स्वामी, अशोक तनपुरे, धर्मेंद्र पवार, उमेश डोर्ले, महिला प्रमुख माधुरी जलमुलवार, वृषाली पाटणे, राणी माने, अर्चना कांबळे, सुमन अहिरे, नम्रता जाधव , संजीवनी शिरसाठ, आशा साळवे, राजू बोराडे, अतिश वडमारे आदी उपस्थित होते.

आयुक्त पुढे म्हणाले ‘ कोणताही धर्म असो भारताची शिकवंण मोठी व आदर्श आहे. मराठीत अस म्हणतात ‘अन्नदाता सुखी: भव’. अशा कार्यक्रमातून कुणीही उपाशीपोटी राहणार नाही.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या हाताला काम आणि भुकेल्या पोटाला अन्न मिळत नसल्याने कष्टकरी कामगारांचे व गोरगरीब जनतेचे प्रचंड हाल होत असल्याने भुकेल्या जीवांचे पोट भरावे या सामाजिक भावनेतून ‘ चार घास सुखाचे’ या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज शहरातील तीन हजार कष्टकरी कामगार व गरजुंना जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम सुरु आहे.

असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार, घरेलू कामगार, रिक्षाचालक, टपरी पथारी, दिव्यांग नागरिक व इतर गरजुंची भुक भागावी, त्यांच्या पोटाला आधार मिळावा यासाठी गेल्या महिन्याभरापासून शहरातील निगडी, आकुर्डी, चिंचवड, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, नेहरूनगर, चिखली व इतर परिसरात मागणीनुसार त्याचे वितरण केले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.