Chikhali News : कोविड लस घेऊन पिंपरी चिंचवड कोरोनामुक्त करूया  : आमदार महेश लांडगे

दिनेश यादव यांच्या पाठपुराव्याने कुदळवाडीत कोविड लसीकरण केंद्र सुरु :

एमपीसीन्यूज : ‘ फ ‘ प्रभाग स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या पाठपुराव्यामुळे पालिकेने कुदळवाडीतील मनपा शाळा, श्री भैरवनाथ मंदिर येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या केंद्रावर वय ४५ वर्षापेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना पहिला व दुसरा कोविड डोस मिळणार आहे.

यावेळी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, आकुर्डी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी सुनिता साळवे, राहुल साळुंखे यांच्यासह इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

आमदार लांडगे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. मात्र, ही संख्या पुन्हा वाढताना दिसतेय. तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र कोरोना लसीकरण मोहिम राबवली जात आहे. सर्वांनी कोविड लस घेऊन एकत्रितपणे मिळून आपला देश व शहर कोरोनामुक्त करू. वय

45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. या लसीकरण मोहिमेत पात्र ठरणाऱ्या कुदळवाडी परिसरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन लस टोचून घ्यावी.

दिनेश यादव म्हणाले, कुदळवाडीतील लसीकरण केंद्रावर 45 वर्षापेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84 दिवसानंतर ते 112 दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रावर सकाळी 10 ते सायं. 5 या कालावधीत पालिकेने निर्धारित केलेल्या क्षमतेनुसार लाभार्थ्यांना लस देण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.