Maval: आचारसंहिता उल्लंघनाबाबत 75 जणांना नोटीस

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाच्या 131 प्राप्त तक्रारीपैंकी 75 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. त्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागितला आहे. तर, 56 तक्रारी निकाली काढल्या आहेत. सर्वाधिक मावळ विधानसभा मतदारसंघातून 37 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सर्वच तक्रारी खोट्या असल्याचे चौकशीत निष्पन झाले आहे. 
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा व अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा नागरिकांना ऑनलाईन पध्दतीने तक्रारी नोंदविण्यासाठी ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदारसंघात आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती देण्यासाठी ऍपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो ‘अपलोड’  करावा लागत आहे.

  • पनवेल विधानसभा मतदारसंघामधून 3, कर्जत 1, उरण 15, मावळ 37, चिंचवड 70 आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अशा 131 आचारसंहिता उल्लंघनाच्या  तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैंकी 75 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून त्यांना नोटिसा पाठवून खुलासा मागितला आहे. तर, 56 निकाल तक्रारी निकाली काढल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.