BNR-HDR-TOP-Mobile

New Delhi : यंदा समाधानकारक पाऊस होणार; सरासरी 96 टक्के पावसाची शक्यता

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- भारतीय हवामान खात्याने आज यंदाच्या हंगामाचा पावसाचा अंदाज जाहीर केला असून या वर्षी सुमारे 96 टक्के पावसाची शक्यता आहे.  भारतीय हवामान खात्यातर्फे आज पहिला अंदाज जाहीर करण्यात आला. त्यानुसार 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या पहिल्या अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव यंदाच्या पावसाळ्यावर होईल अशी भीती बाळगण्याची गरज नाही.

यंदा एल निनोचा प्रभाव असण्याची शक्यता जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे भारतावर दुष्काळाचे सावट येण्याची भीती होती. मात्र आज जाहीर झालेल्या पहिल्या अंदाजानुसार ही शक्यता कमी आहे. जर एल निनोचा प्रभाव निर्माण झाला तर दुष्काळजन्य स्थिती निर्माण होते. पण आता ही भीती बाळगण्याची गरज नाही.

गेल्या वर्षी परतीचा पाऊस न झाल्यामुळे सध्या राज्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. मात्र आता समाधानकारक पावसाचा अंदाज जाहीर झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण होईल.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.