Maval : पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आले समोरा समोर; दोघांनीही हस्तांदोलन करून दिल्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करून जात असताना महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची समोरासमोर भेट झाली. त्यावेळी पार्थ यांनी बारणे यांच्याकडे जाऊन हस्तांदोलन केले. हा क्षण बघण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.

निगडी, येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते जात असताना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे अर्ज भरण्यासाठी येत होते. त्यावेळी पार्थ यांनी बारणे यांच्याकडे जाऊन हस्तांदोलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.