Maval News : कारचा आरसा लागल्याने तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – कारचा आरसा एका दुचाकीस्वारास लागल्याने दुचाकीस्वाराने त्याच्या चार ते पाच साथीदारांसोबत मिळून कार चालक तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच जखमी कार चालक तरुणाला धमकी देऊन आरोपी निघून गेले. ही घटना रविवारी (दि. 31) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास सोमाटणे टोलनाक्याच्या जवळ सोमाटणे येथे घडली.

धीरज अनिल गरुड (रा. तळेगाव दाभाडे) आणि त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकेत रमेश ढमढेरे (वय 26, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कारमधून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात होते. सोमाटणे येथे सोमाटने टोलनाक्याच्या जवळ फिर्यादी यांच्या कारचा आरसा आरोपी धीरज याला लागला. त्यावरून आरोपी धीरज याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून फिर्यादी यांची गाडी अडवली. त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडाने डोक्यात मारून जखमी केले. त्यानंतर धमकी देऊन आरोपी निघून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.