Maval: प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवेसी यांची देहूरोडमध्ये उद्या सभा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या (रविवारी) अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची संयुक्‍त सभा होणार आहे.

देहुरोड येथील महात्मा गांधी मैदानात दुपारी चार वाजता ही सभा होणार आहे. मावळातील लढतीकडे राज्याचे लक्ष आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादीकडून तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे पु्न्हा शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी पहिल्यांदाच वंचित आघाडीने आपले उमेदवार उभे केले आहेत.

  • वंचित आघाडीकडून मावळातून राजाराम पाटील निवडणुकीत रिंगणात आहेत. मावळातील प्रचार अंतिम टप्यात आहे. आता पाटील यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी सभा घेणार आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like