BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवड

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील नानोली तर्फे चाकणच्या उपसरपंचपदी निलेश नानाभाऊ लोंढे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच मोनिका शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दीपक राक्षे यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी निलेश लोंढे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी राक्षे यांनी निलेश लोंढे यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. बाळासाहेब भेगडे, किसनराव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या बिनविरोध निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

  • यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिता बोऱ्हाडे, शशिकला लोंढे, प्रशांत साळवे, माजी सरपंच किसनराव लोंढे, उद्योजक निलेश भेगडे, आशिष खांडगे, आनंदा काळे, खंडू जगताप, निखील भेगडे, शंकर मराठे, रामभाऊ जगताप, महादू लोंढे, शंकर बोऱ्हाडे, शरद लोंढे, संतोष लोंढे, चंद्रकांत लोंढे, सुधीर चिंचवडे, देवदास पोटवडे स्वप्निल गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच लोंढे यांनी निवडीनंतर सांगितले.

HB_POST_END_FTR-A4

.