Maval: शेअर्सच्या मोबदल्यात शरद पवार यांना 50 लाख, सुप्रियाताईंना 20 लाख आगाऊ दिले; पार्थ पवारांचे संपत्तीचे विवरण पत्र 

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे पवार कुटुंबातील पार्थ पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.  पार्थ यांनी आपल्याकडील स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील सादर केला आहे. पार्थ यांच्याकडे सध्या तीन कोटींची जंगम मालमत्ता आहे. तर, 16 कोटी 42 लाख स्थावर मालमत्ता असून एकूण 19 कोटी 97 लाख रुपयांचे ते मालक आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आजोबा शरद पवार यांना शेअर्सच्या मोबदल्यात 50 लाख तर आत्या सुप्रियाताईंना 20 लाख रुपये आगाऊ पार्थ यांनी दिले आहेत. तर, आई सुनेत्रा यांना सात कोटी 13 लाख, लहान भाऊ जय याला नऊ कोटी 36 लाख रुपयांचे देणे आहे. असे पार्थ पवार यांनी आपल्या संपत्तीच्या विवरण पत्रात म्हटले आहे. उत्पन्नाचा स्त्रोत व्यवसाय आणि शेती आहे.  
पार्थ हे मुंबई विद्यापीठातून बी. कॉम झाले आहेत. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. तसेच खटला देखील प्रलंबित नाही. पार्थ यांच्याकडे सध्या तीन कोटींची जंगम मालमत्ता आहे. तर, 16 कोटी 42 लाख स्थावर मालमत्ता असून एकूण 19 कोटी 97 लाख रुपयांचे ते मालक आहेत. त्यांच्याकडे तीन लाख 67 हजार रुपयांची रोकड आहे.  पाच वर्षापासून ते आयकर भरतात. त्यांच्या बँक खात्यात 65 लाख 66 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. शेअर्समध्ये 9 लाख 66 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी एक कोटी 29 लाखाचे कर्ज दिले आहे.

  • पार्थ यांच्याकडे ट्रॅक्टर, मोटार सायकल, ट्रेलर अशी नऊ लाख 31 हजार रुपयांची वाहने आहेत. 391 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 12 लाख 36 हजार आहे. तर, 11 लाखाची त्यांच्याकडे चांदी आहे अशी एकूण तीन कोटी 69 लाख रुपये त्यांची जंगम मालमत्ता आहे. स्थावर मालमलमत्तेत बारामतीतील सोनगाव, ढेकळवाती आणि मुळशीत पार्थ यांची वडिलोपार्जित जमीन आहे. बिगर शेतजमीन देखील त्यांच्याकडे आहे.
पुण्यात शिवाजीनगर येथे ‘जिजाई’ नावाने पार्थ यांचा बंगला आहे. त्याची खरेदीची किंमत पाच कोटी होती. सध्याच्या बाजारभावानुसार 13 कोटी 16 लाख रुपये बंगल्याची किंमत आहे. आई सुनेत्रा यांना सात कोटी 13 लाख 13 हजार 295, तर लहान भाऊ जय याला दोन कोटी 23 लाख असे एकूण नऊ कोटी 36 लाख 13 हजार 295 रुपयांचे देणे पार्थला आहे.
  • स्वत:च्या कष्टाने त्यांनी पाच कोटी सात लाख रुपये कमविले आहेत. त्यांना एचडीएफसी बँकेकडून 2 लाख 34 हजार रुपयांचे व्याज मिळते. त्यांनी बँक, वित्तीय संस्थाकडून 9 कोटी 36 लाखाचे कर्ज घेतले आहे. त्यांना कोणतेही शासकीय देणे नाही. विविध संस्थांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.