Maval/ Shirur: मावळसाठी सात तर, शिरुरसाठी तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाठी सात आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी तिघांनी आज (शुक्रवारी) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना मंगळवारी (दि. 2) जारी झाली आहे. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज वाटप करणे आणि स्वीकरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चार दिवसात मावळ लोकसभा मतदारासंघासाठी 38 तर, शिरुरसाठी 35 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.

मावळ मतदारसंघासाठी पनवेल येथील नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांनी अपक्ष दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हिन्दुस्तान जनता पार्टीचे भीमराव आण्णा कडाळे, बळीराजा पार्टीचे गुणाट संभाजी नामदेव, अजय हनुमंत लोंढे यांनी अपक्ष, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे मदन शिवाजी पाटील यांनी दोन आणि रिपल्बिकन सोशालिस्ट पार्टीचे सुनील बबन गायकवाड यांनी आज (शुक्रवारी) आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकूण सात जणांनी निगडी, येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक विभागाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

  • तर, शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, मावळ आणि शिरुर मतदारसंघामधून निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांना 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. प्राप्त अर्जांची छाननी 10 एप्रिल रोजी होणार आहे. तर, 12 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. 29 एप्रिलला या दोन मतदारसंघासाठी प्रत्यक्षात मतदान पार पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.