Bhosari: ”पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट”; आमदार महेशदादांची सोशल मीडियावर मोहिम

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देशाच्या ज्येष्ठ नेत्यांवर सोशल मीडियाद्वारे अतिशय खालच्या शब्दात चिखलफेक केली जाते. नेत्यांवर चिखलेफक करु नये, नेत्यांचा सन्मान राखला जावा. संस्कृती जपली जावी, हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सोशल मीडियाद्वारे ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ ही मोहीम सुरु केली आहे. फेसबुक, व्हॉटस्‌ अॅप, ट्‌विटर या सोशल मीडियावर पोस्ट टाकताना नेटिझन्सला या मोहिमेच्या माध्यमातून नेत्यांचा सन्मान राखण्याची विनंती केली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रचारात राष्ट्रीय ते स्थानिक पातळवरील नेत्यांवर कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरद्वारे चिखलफेक केली जाते. ट्रोल केले जाते. त्याबाबतचा मजकूर, व्यगंचित्र, चित्रफीत, फेसबुक, व्हॉटस्‌अॅप, ट्‌विटर अशा सोशल मीडियातून ट्रोलिंग केले जाते. मोडतोड करुन ‘व्हिडीओ’ व्हायरल केले जातात. त्याला आळा बसवा, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ ही मोहिम सुरु केली आहे.

  • फेसबुक, व्हॉटस्‌अॅप, ट्‌विटर या सोशल मीडियावर पोस्ट टाकताना तरुणांनी संयम बाळगला पाहिजे. पोस्ट टाकताना मान्यवर नेत्यांचा सन्मान राखला पाहिजे. एकमेकांवर कुरघोड्या करुन नाही, तर माणूस स्वत:च्या कतृत्वाने मोठा होतो…अशी पोस्ट महेश लांडगे यांनी फेसबुकवर टाकली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, आरपीआएचे अध्यक्ष रामदास आठवले, रासपचे अध्यक्ष महादेव जाणकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, महिला व बालकविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा फोटो या पोस्टमध्ये टाकले आहेत. मान्यवर नेत्यांचा सन्मान राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

”सोशल मिडीयाचा वापर विधायक आणि सकारात्मकतेसाठी व्हावा, तरुणांनी संयम बाळगला पाहिजे. कोणाची बदनामी होईल. अफवा पसरेल, अशा पोस्ट व्हायरल करु नयेत. वैयक्तिक टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्यांवर कोणतीही निवडणूक लढली पाहिजे. विरोधी पक्षाचा उमेदवार असला तरी देखील त्याचे चारित्र हनन करणे योग्य नाही”, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.