Maval : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ‘सोशल मीडिया’वरून चिखलफेक

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार उद्या संपणार असताना आज (शुक्रवारी) महायुती आणि महाआघाडीच्या नेटीझन्सच्या समर्थकांकडून ‘सोशल मीडिया’वरून चिखलफेक केली जात आहे. महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे वैयक्तिक बदनामी करणारे फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केले जात आहेत.

मावळमध्ये महाआघाडीचे पार्थ पवार आणि महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्यात लढत आहे. पवार घराण्यातील उमेदवार असल्याने याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पवार घराण्याची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही उमेदवारांकडून सुरुवातील वैयक्तिक आरोप करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांकडून वैयक्तिक आरोप करणे टाळले. समोरा-समोर भेटल्यावर दोघांनीही हस्तांदोलन करत एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे निवडणूक हेल्दी आणि शांततेत पार पडत असल्याचे वाटत होते.

प्रचार उद्या संपणार असतानाच आज (शुक्रवार)पासून महायुती आणि महाआघाडीच्या नेटीझन्सच्या समर्थकांकडून ”सोशल मीडिया’वर चिखलफेक सुरु केली आहे. महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे वैयक्तिक बदनामी करणारे फोटो ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ केले जात आहेत.

महायुतीच्या नेटीझन्सच्या समर्थकांनी पार्थ पवार यांचे वैयक्तिक बदनामी करणारे फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केल्यानंतर महाआघाडीच्या नेटीझन्स सर्मथकांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे वैयक्तिक बदनामी करणारे फोटो ‘सोशलमिडी’यावर व्हायरल केले आहेत.

याबाबत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना छेडले असता ते म्हणाले, ‘सोशल मीडिया’वर कोणाचे नियंत्रण नाही. भाजप खालच्या पातळीवर जाऊन असा प्रचार करत नाही. ‘सोशल मीडिया’वर असे करणे चुकीचे आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने खालच्या स्तरावर जाऊन असा प्रचार करु नये, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.