Chikhali : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- एकतर्फी प्रेमातून लग्नाची मागणी करत तसेच भावांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी गुरुवारी (दि. 25) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकऱणी 17 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली असून प्रथमेश वाघमारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनिरीक्षक रत्ना सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिडीतेचा सतत पाठलाग करून लग्नाची मागणी करत असे. बुधवारी (दि. 24) रात्री साडेआठच्या सुमारास ती घरासमोरील रस्यावर थांबली असताना आरोपीने तिचा हात पकडला व पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नाला होकार दिला नाही तर तुझ्या भावाना मारुन टाकेन अशी धमकी देत विनयभंग केला. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.