Pimpri : ‘राज ठाकरे त्यांचे काम करत आहेत, जनता निर्णय घेईल’

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप महायुती आम्ही प्रचार करुन आमचे काम करत आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा आम्हाला फटका बसणार नाही. ठाकरे त्यांचे काम करत आहेत. जनता काय करायचे तो निर्णय घेईल, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात सभा घेऊन जोरदार प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत. मोदी यांच्या जुन्या भाषणांचे व्हिडीओ दाखवून भाजपची पोलखोल करत आहेत.

राज ठाकरे यांच्या सभांचा भाजपला फटका बसेल का? याबाबत विचारले असता गिरीश बापट म्हणाले, “शिवसेना-भाजप महायुती आम्ही प्रचार करुन आमचे काम करत आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा आम्हाला फटका बसणार नाही. ठाकरे त्यांचे काम करत आहेत. जनता काय करायचे तो निर्णय घेईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.