Lonavala : पाण्याच्या टाकीत पडून लहान मुलाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – तुंगार्ली गावच्या हद्दीत असलेल्या गोल्डव्हॅली परिसरातील सोसायटीमधील एका पाण्याच्या टाकीत पडून एका साडेचार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.

ओम राजू धोत्रे (वय साडेचार वर्षे, रा. मोदी बंगला, गोल्डव्हॅली, तुंगार्ली, लोणावळा, मूळ रा. सैविंदाने, शिरूर) असे पाण्याच्या टाकीत पडून बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

  • लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम धोत्रे हा साडेचार वर्षाचा मतिमंद मुलगा त्याच्या आईसोबत मोदी बंगला येथे रहात होता. आज दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान ओम बंगल्याच्या परिसरात असलेल्या एका टाकीत खेळता खेळता पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. यासंदर्भात ओमचा मामाने लोणावळा शहर पोलीस ठाण्याला खबर दिली. खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पहाणी करत ओमचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

या घटनेची पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.