Maval : श्रीरंग बारणे यांना मावळातून 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ – बाळा भेगडे

ज्येष्ठांचा आशीर्वाद, सहकारी कार्यकर्त्यांना भेटून खासदार बारणे यांचा तळेगाव दाभाडे येथे प्रचार दौरा

एमपीसी न्यूज – श्रीरंग बारणे हे जनसामान्यांना सहज उपलब्ध होणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांची जनमानसात मनमिळाऊ नेता अशी प्रतिमा आहे. त्यांच्याकडे कामाची निष्ठा असल्याने तेच पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार आहेत असा विश्वास दाखवत मावळ तालुक्यातून 50 हजार मतांची आघाडी मिळवून देणार असल्याचे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले.

शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी तळेगाव दाभाडे येथे गाठीभेटी दौरा केला. या दौ-यामध्ये त्यांनी ज्येष्ठ पदाधिकारी, नागरिकांचे आशीर्वाद घेतले. सहकारी कार्यकर्त्यांची भेट घेत नागरिकांशी संवाद साधला.

तळेगाव दाभाडे भेटीगाठी दौ-यात माजी नगराध्यक्षा आणि ज्येष्ठ नगरसेविका सुलोचनाताई आवारे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुलोचनाताई आवारे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी होण्याचे आशीर्वाद देत त्यांचे औक्षण केले. त्याचबरोबर माजी आमदार तु. ना. माताडे, माजी नगराध्यक्षा संगीता धोत्रे, माजी नगराध्यक्ष अॅड. रवींद्र दाभाडे, माजी नगराध्यक्ष गोरखनाथ काळोखे, उपनगराध्यक्षा विणा शिंदे, पक्षनेते सुशील सैंदाने, माजी उपनगराध्यक्षा वीणा शिंदे, संदीप गराडे, डॉ. प्रदीप लिमये, चेतन भेगडे, रामनाथ वारींगे, बाळासाहेब शेंडगे, चिरागशेठ खांडगे, राजेंद्र जाधव, गिरीश खैर, शिवाजी भेगडे, आनंद भेगडे, गणपत उर्फ सागर शर्मा, रवी साबळे, रवी आवारे, संदीप काकडे, प्रशांत शाह, अरुण जांभूळकर, राजू नाटक, महेंद्र धारणे, आरएसएसचे गणेश बेल्हेकर, आरपीआयच्या नगरसेविका अनिता पवार, अनिकेत दाभाडे, दिलीप कुलकर्णी, स्वानंद आगाशे, उल्हास भगत, मच्छिन्द्रनाथ काळोखे, नगरसेविका कल्पना भोपळे, रामभाऊ कुल, साहेबराव दाभाडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, इंदरशेट ओसवाल आदींच्या निवासस्थानी भेट दिली.

यावेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, गणेश भेगडे, संतोष दाभाडे, रवी आवारे, संदिप काकडे, रामनाथ वारींगे, रजनी ठाकूर, शोभा भेगडे, ज्योती जाधव, मनोज कासव, माजी युवध्यक्ष रवींद्र भेगडे, राम कुबेर, विनीत भेगडे, महेश केजरीवाल, संदीप काकडे, नीता काळोखे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, गिरीश करंडे, संदीप शेळके, प्रशांत ढोरे, अरुण भेगडे, रवींद्र आवारे, अॅड. विजया भांडवलकर, महिला आघाडी भाजप अध्यक्षा संगीता शेळके, संतोष शिंदे, आप्पासाहेब गव्हाणे, आप्पा वर्तले, राजू खांडभोर, सिद्धार्थ भेगडे, दत्ता भेगडे, प्रदीप शिंदे, सिध्दनाथ नलावडे, देव खरटमल, सागर सिद्धानकर, सतीश गरुड, सतीश शेलार, सागर जाधव, सदाशिव भोसले, सुनील कारंडे, निलेश पारगे, योगेश पारगे, दर्शन धामणकर, प्रशांत काळे, प्रदीप गडदे, सुनील पवार आदी उपस्थित होते.

त्याचबरोबर शाह कॉलनी मधील साईबाबा मंदिर, वतननगर मधील जैन मंदिर, बालाजी मंदिर, तुळजाभवानी मंदिरात माथा टेकून दर्शन घेतले. बॅलाडोर सोसायटीला भेट दिली. भारत माता उद्यानात फेरफटका मारून उद्यानात आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. तळेगाव स्टेशन येथे अमर हिंद मित्र मंडळाने ढोल ताशांच्या गजरात खासदार बारणे यांचे स्वागत केले. रवी साबळे यांच्या घरी महिलांनी प्रवेशद्वारावर ‘मैं भी चौकीदार’ अशी रांगोळी काढून खासदार बारणे यांचे स्वागत केले. सॅमको कॉलनी मैदानात खासदार बारणे यांनी हॉलीबॉल च्या खेळात सहभाग घेतला. सिद्धार्थ नगर येथे खासदार बारणे यांनी स्थानिक नागरिक व भाजी विक्रेत्या महिलांशी संवाद साधला. जैन आणि व्यापारी समाजाने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मागील लोकसभा निवडणुकीत तळेगाव परिसरातून चांगले मताधिक्य मिळाले होते. तळेगावकरांनी विश्वास दाखवून मला निवडून दिले. तो विश्वास सार्थ करत मागील पाच वर्षात देशाच्या संसदेत उत्तम कामगिरी केली. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना मावळ लोकसभा मतदारसंघात राबवल्या. नरेंद्र मोदी हे देशाची प्रतिमा उजळणारा पंतप्रधान आहेत, अशी त्यांची जगभर प्रतिमा आहे. त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे देशाचा नावलौकिक वाढत आहे. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.