Maval : सुदुंबरे, वराळे, साई, शिरगांव व कान्हे प्रतिबंधित झोन !

Sudumbare, Warale, Sai, Shirgaon and Kanhe are now containment zone! संदेश शिर्के यांनी वरील गावांचा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर केला आहे.

एमपीसी न्यूज –  मावळातील सुदुंबरे, वराळे, साई, शिरगांव व कान्हे येथे कोरोना विषाणूंचे संसर्ग संक्रमित रूग्ण आढळल्याने प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी वरील गावांचा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर केला आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुदुंबरे, वराळे, साई व शिरगांव या गावांचा परिसर  तर कान्हे गावचा प्रभाग 4 व 5 पूर्ण परिसर. वराळे येथील संपूर्ण इको सिटी, आइस पार्क व संपूर्ण बाजारपेठ कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

 तर सुदवडी, जांबवडे, नानोली, आंबी, माळवाडी, वाउंड, कान्हेचा प्रभाग 3 आंबेवाडी संपूर्ण बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्रात ये-जा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.