Maval News : बेंगलोर येथील ‘खेलो इंडिया’ वेटलिफ्टींग स्पर्धेत मावळच्या महेश असवले याला रौप्य पदक

एमपीसी न्यूज – बंगलोर येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत मावळ तालुक्यातील टाकवे येथील 22 वर्षीय महेश दत्तात्रय असवले याने 67 किलो वजनी गटात एकूण 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले.

यापूर्वी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धामध्ये महेशने दोन सुवर्ण तर आता रौप्य पदकाची कमाई केली आहे. महेश असवले हा बिहारीलाल दुबे, आनंद जाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुबेज गुरुकुल वडगाव मावळ येथे सराव करत आहे. खेलो इंडिया मध्ये नेत्रदीपक कामगिरी करत रौप्य पदक प्राप्त केल्या बद्दल महेशचे मावळ तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.