Pimpri News : ‘पीसीएमसी’ ई- कॉमर्स मर्चंट मोड्यूलद्वारे व्यापारी, ग्राहकांना मिळणार खरेदी- विक्रीची सुविधा

एमपीसी न्यूज – शहराचे स्थानिक अर्थकारण बळकट व्हावे, स्थानिकांना रोजगार मिळावा तसेच, ग्राहकांना सवलतीच्या दरात उत्तम गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळावीत, या हेतूने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीवतीने ई- कॉमर्स मर्चंट मोड्यूलची निर्मिती करण्यात आली आहे. ई- कॉमर्स मर्चंड मॉड्यूलद्वारे देण्यात येणा-या ऑनलाईन खरेदी विक्रीच्या सुविधासंदर्भात माहिती देण्यासाठी स्मार्ट सिटीच्या वतीने व्यापारी वर्गाकरीता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला व्यापारी बांधवांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विनिता बसंतानी, सहाय्यक प्राध्यापक हेमंत राजेस्थ, झमटानी ग्रुपचे अध्यक्ष परमानंद झमटानी, राजन आसवानी, किराणा आणि सुकामेवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम मेघराजानी, रेडीमेड असोसिएशनचे अध्यक्ष नीरज चावला, होलसेल, रेडीमेड आणि होजिअरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश मोटवानी, विश्व सिंधी सेवा संघ, सेन्ट्रल पंचायत, सिंधू सेवा संघ आदी संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी यांच्यासह 70 व्यापारी बांधव उपस्थित होते.

शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी, यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ हे अधिकृत मोबाईल अॅप्लीकेशन आणि वेब पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. त्याद्वारे शहरातील व्यापारी, ग्राहकांना वस्तू खरेदी-विक्री सोयीचे व्हावे, याकरीता ‘ई- कॉमर्स मर्चंट मोड्यूल’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी ई- कॉमर्स मर्चंट मोड्यूलमुळे नागरिकांना ऑनलाईन खरेदीची सुविधा उपलब्ध होऊन सवलतींचा लाभ मिळणार आहे.

व्यापारी बांधवांना देखील व्यवसायवृद्धीसाठी याचा उपयोग होईल, याबाबत स्मार्ट सारथीचे अभिजीत पाठक, आशिष चिकणे, विवेक पाटील यांनी ई- कॉमर्स मर्चंड मॉडूयलमध्ये नोंदणीबाबत उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले. या योजनेचे तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. प्रसंगी, व्यापारी बांधवांनी विचारलेल्या माहितीपर प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. व्यावसायिकांनी ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या वेब पोर्टल आणि मोबाईल अॅपवर नोंदणी करून सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा यादव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.