Mhada Lottery : म्हाडाच्या घरांबाबत राज्य सरकारने केला नियमात बदल

एमपीसी न्यूज – महानगरात स्वस्तात घरे उपलब्ध करुन देणार्या म्हाडाने उत्पन्न मर्यादेत मोठे बदल केले आहेत.राज्य सरकारच्या २५ मे रोजीच्या आदेशानुसार म्हाडाच्या सोडतीच्या उत्पन्नाच्या मर्यादेत बदल केला आहे.

 

या नव्या बदलानुसार मुंबई, ठाणे,पुण्यासह मोठ्या महानगरातील १८ लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार नाही.सरकारने या महानगरात उच्च उत्पन्न गटासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १२ लाख ते १८ लाख निश्चित केली आहे.

 

Monsoon Arrives : आला रे आला; नैऋत्य मान्सून कोकणात

 

 

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणारेंपैकी महिन्याला ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणार्या व्यक्ती आणि कुटुंबाचा समावेश उच्च उत्पन्न गटात केला जात होता.पण यापुढे महिन्याचे उत्पन्न दीड लाख रुपयांपर्यंत असणारे उच्च उत्पन्न गटात येतील.मासिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा अधिक असणार्यांना छोटया शहरातील म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करता येईल.

 

 

 

 

राज्य सरकारने याबाबत २५ मे रोजी एक अध्यादेश जारी केला आहे.त्यानुसार उच्च उत्पन्न गटासाठी वार्षिक मर्यादा ९ लाखावरुन १२ ते १८ अशी केली आहे.याचा अर्थ असा की, ज्या व्यक्ती, कुटुंबाचे मासिक उत्पन्न दीड लाखांपर्यंत असेल तेच मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर मोठ्या शहरात म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करु शकतील. सरकारच्या या निर्णयामुळे उच्च उत्पन्न गटात येणारे प्रशासकीय अधिकारी,छोटे मोठे व्यापारी, खासगी क्षेत्रातील नोकरदार यांना मुंबई, ठाण्यात घरासाठी अर्ज करता येणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.